सोलापूर प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
रविवार, दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 12.40 वाजता सोलापूर विमानतळ येथे आगमन. दु. 12.45 वाजता विमानतळ येथून न्यू इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज व डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला कडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज, डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता स्व. डॉ. गणपतराव देशमुख स्मारक अनावरण व महाविद्यालय नामांतर सोहळा उपस्थिती. सायंकाळी 4.00 वाजता मोटारीने सोलापूर विमानतळ कडे प्रयाण. सायंकाळी 5.35 वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण.