सोलापूर प्रतिनिधी
श्री करंजकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित करंजकर विद्यालय तुळजापूर वेस येथील सोलापूर या शाळेमध्ये आज स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री नीलकंठप्पा कोनापूरे ,माजी नगरसेवक अमित पाटील, संस्थेच्या सचिवा श्रीमती धानम्मा मधली, जैन सोशल ग्रुप संगिनीच्या अध्यक्षा सोनाली पालिया, कविता भस्मे , या सर्वांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी समूहगीत नृत्य आणि स्केटिंग सारखी प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नितीन तालीकोटी, सिद्धरामय्या स्वामी, नीता स्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमानंतर संगिनी जैन सोशल ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या समूहगीताला तिसरे आणि उत्तेजनार्थ अशी दोन बक्षिसे मिळाल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापिका तडकासे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अलका मलगोंडे यांनी केले आभार रुद्रमणी स्वामी यांनी मानले. तर सूत्रसंचालन श्रीदेवी येळमेली यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पालक शाळेतील शिक्षक वॄंद, शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न केले.