पंढरपूर ता.प्रतिनिधी बिरूदेव केंगार
प्रसन्न फाउंडेशन यांच्या वतीने शैक्षणिक योगदानाबद्दल दिला जाणारा दीपस्तंभ आदर्श शिक्षक पुरस्कार पिराची कुरोली येथील मॉडर्न हायस्कूलचे शिक्षक मधुकर वाघेरे यांना ग्लोबल टीचर रणजीतसिंह डीसले व उपजिल्हा अधिकारी अजयकुमार नष्टे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशिल मोहिते पाटील , प्रसन्न फाउंडेशनचे अध्यक्ष ,सातारा सैनिक शाळा व्यवस्थापन समिती सदस्य नवनाथ धांडोरे, प्रज्ञादीप अकॅडमीचे नागेश नरळे , जिल्हा निबंधक सिद्धार्थ गायकवाड ,सुनिल लिगाडे उपस्थित होते.
मॉडर्न हायस्कूल संस्थेचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी वाघेरे यांचे शैक्षणिक योगदानाबद्दल विशेष अभिनंदन केले आहे .हा पुरस्कार वाघेरे यांना मिळाल्याबद्दल पिराची कुरोली व पंचक्रोशीत यांचे कौतुक करून अभिनंदन करण्यात येत आहे.