अकलूज प्रतिनिधी
जय हिंद महाराष्ट्र घडशी समाज संघटनेच्या वतीने उद्या 8/8/2023 रोजी बारामती येथे आमरण उपोषण आयोजित केले आहे.अशी माहिती प्रदेश अध्यक्ष तुकाराम साळुंखे यांनी दिली आहे .
यावेळी तुकाराम साळुंखे म्हणाले की,आपण सर्वांनी समाज हितासाठी साथ द्यावी, घडशी समाजासाठी स्वतंत्र शेती महामंडळ, युवकांच्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, घडशी समाजातील कलाकारांना मानधन द्यावे. समाजातील व्यक्तीस विधान परिषदेवर किंवा इतर महामंडळावर प्रतिनिधित्व द्यावे. घडशि समाज हितासाठी मागणी आहेत.
आपण साथ दिली तर यापुढे मी ही यापुढे शासन दरबारी लढाई देऊन आणि या लढाईतून संघर्षातून न्याय मिळवून देईन. आपण आपल्या समाज हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन, तरुणांनी व तरुणीने या सर्वांनी आमरण उपोषणाला व आंदोलनास उपस्थित राहावे. असे आवाहन तुकाराम साळुंखे यांनी केले आहे.