पंढरपूर प्रतिनिधी
येणाऱ्या काळात वाढदिवस, पुण्यस्मरण यासारख्या उपक्रम मध्ये सर्वांनी सामाजिक भान ठेवून सार्वजनिक उपक्रम राबविले पाहिजेत असे मत युटोपीयन साखर कारखाना चे अध्यक्ष उमेश परिचारक यांनी युनिक हॉस्पिटल व ट्रामा केयर यांनी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान शिबिराच्या वेळी व्यक्त केले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अस्थिरोग तज्ञ डॉ.पारस राका हे उपस्थित होते.
आरोग्यासाठी सर्वांनी जागरूक असले पाहिजे, गोरगरिबांना आणि गरजू रुग्णासाठी युनिक हॉस्पिटल व राका हॉस्पिटल च्या माध्यमातून हाडांची ठिसूळता तपासणी,रक्तातील साखर तपासणी, कॅल्शियम तपासणी,कोलेस्ट्रॉल तपासणी,नेत्र तपासणीआश्या विविध तपासण्या या शिबिरात मोफत करण्यात आल्या असल्याची माहिती डॉ.पारस राका व डॉ.अमितकुमार आसबे यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेवक गणेश अधटराव,नगरसेवक सचिन शिंदे,डॉ.अनिल काळे,डॉ.सीमा राका, डॉ.कौस्तुभ घाटूळे,डॉ.अंजु आसबे,डॉ.कवारे,भाजपा वैद्यकीय सेल चे अध्यक्ष डॉ.श्रीधर येलमार,राजू पाटील,आदी उपस्थित होते.