सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालया तील इलेक्ट्रिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा. विजयकुमार बिरादार यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, जळगाव विद्यापीठाची इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग विषयात पी.एच. डी.पदवी जाहीर झाली आहे.
इन्स्ट्रूमेंटेशन इंजिनीअरिंग अभियांत्रिकी क्षेत्रातील " स्लायडिंग मोड कंट्रोल ॲप्रोच फॉर ओपन लूप स्टेबल अँड अनस्टेबल प्रोसेसस " हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. डॉ. गजानन मालवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा शोधनिबंध पूर्ण केला.
डॉ. विजयकुमार बिरादार यांच्या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ. शेखर जगदे व डॉ. रवींद्र व्यवहारे, डॉ. प्रदीप तपकिरे, डॉ. दत्तात्रय गंधमल, डॉ. विनोद खरात, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या प्रा.निखत शेख यांनी अभिनंदन केले.