पुणे प्रतिनिधी
साहित्य क्षेत्रात प्रगती करत असलेला आपला सर्वांचा लाडका आदर्श युवक साहित्यिक रोहित संजय पाटकर ह्याचे एवढे कौतुक करावेसे वाटते की, आपली नोकरी सांभाळून आपली कला जोपासत आहे.
आणि अवघ्या २४ व्या वर्षात २ पुरस्कार मिळवले आहेत खरंच कौतुकास्पद आहे आणि हे पुरस्कार मिळवण्याआधी देखील त्यांनी २ पुस्तक देखील प्रदर्शित केले.
1)पुस्तक हे कोरोना काळात लिहिले होते त्या पुस्तकाचे नाव : एका महामारीतील परिस्थिती आणि त्यानंतर
२ रे पुस्तकाचे नाव: रोहितचे विचार ( प्रेम कविता आणि बरंच काही ) हि दोन्ही पुस्तके Amazon, Flipcart वर उपलब्ध आहेत तुम्ही सर्व जण हे पुस्तके आँनलाईन मागवुन आपला वाचनाचा छंद जोपासु शकता...!
दि : २ जानेवारी २०२३ रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह ठाणे येथे सेलेब्स अँड गॉसिप महाराष्ट्र रत्न पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आले होते.
तसेच सालाबादप्रमाणे यंदाही मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित
21 व्या वर्षातील राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद आणि शानदार पुरस्कार रविवार दि : १३ ऑगस्ट २०२३ रोजी दादर येथील वनमाळी सभागृहात अगदी उत्साहात पार पडला आणि त्या पुरस्काराचा तो मानकरी ठरला आहे...!
हा पुरस्कार मिळवून सर्वांचा आनंद त्यांनी अगदी द्विगुणितच केला आहे असे म्हणायला हरकत नाही.
त्याचे खूप खूप अभिनंदन आणि असेच अनेकानेक पुरस्कार मिळवत जा ह्याच तुला शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा....!