माळशिरस तालुका प्रतिनिधी जयराम घाडगे
सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांची ८३ वी जयंती वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी व वेळापूर ग्रामस्थ यांच्यावतीने साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते पांडुरंग भाऊ माने देशमुख हे होते. प्रारंभी कै. सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, आणि जेष्ठ नेते पांडुरंगभाऊ माने देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर विविध क्षेत्रात निवड झालेले व यश मिळवलेले अशोक पवार, डॉ. शिवाजी चौगुले, सौरभ प्रकाश माने देशमुख, तुषार मल्हारी नवले, विश्वजीत किरण काळे, रुद्रतेज अमरसिंह माने देशमुख, हरिदास भीमराव मेटकरी आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी कै सूर्यकांतदादा माने देशमुख यांच्या जीवनावर हनमंत मेलगे सर, सहकार महर्षी विद्यालय मुख्याध्यापक उदय उरणे , कमलाकर माने देशमुख, अशोक पवार यांनी कै.सूर्यकांतदादाच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त करून कै सूर्यकांत दादांच्या जीवनाचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करावी हीच खरी आदरांजली ठरणार आहे असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आनंदनगर सोसायटीचे चेअरमन शशिकांत अण्णा माने देशमुख, सहकार महर्षी कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख, ज्येष्ठ नेते पांडुरंगभाऊ माने देशमुख, युवराजसिंह राजे भोसले, अरविंद जाधव, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे हनमंत मेलगे व हरिभाऊ माने सर, विश्व हिंदू परिषदेचे रमाकांत देशपांडे, अकलूज मार्केट कमिटीचे नूतन संचालक बाळासाहेब माने देशमुख, माजी संचालक आनंदराव माने देशमुख, महेश काळे पाटील, डेअरी चेअरमन तानाजी मुंगुसकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माढा लोकसभा अध्यक्ष कमलाकर माने देशमुख, ओंकार माने देशमुख, महादेव देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अमृतराज माने देशमुख व मित्रपरिवार , भाजपा ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष व माजी उपसरपंच शंकरराव काकुळे, भाजपा तालुका उपाध्यक्ष व वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने देशमुख व त्यांचे मित्रपरिवार, ग्रामपंचायत सदस्य अमृतराज माने देशमुख, दीपकआबा राऊत, रविराज गायकवाड, दीपक चव्हाण, सोसायटीचे , विनायकराव माने देशमुख, वीरकुमार दोशी, युनूस सय्यद, सुखदेव जाधव, शिवाजी मोहिते, उमेश बनकर, मल्हारीमामा शिंदे, अमित पुंज, भैया कोडग, विनायक माने देशमुख, शहाजीराव शीॅके, माजी सरपंच विश्वास वाघे, रंगादादा माने, हनुमंतराव गायकवाड, माजीसंचालक,भिमराव मेटकरी गोपाळ मेहत्रे, हरिभाऊ आडत, तसेच वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सर्व संचालक सभासद व कर्मचारी वर्ग अर्धनारी नटेश्वर महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वर्ग आणि वेळापूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर देशपांडे व हरिभाऊ मेटकरी यांनी केले तर शेवटी सर्वांचे आभार सोसायटीचे व्हाईस चेअरमन महादेवभाऊ ताटे यांनी मानले.