सांगोला प्रतिनिधी
स्व गणपतरावजी देशमुख ऊर्फ आबासाहेब यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त महुद जिल्हा परिषद गटाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दिनांक ९/८/२०२३ रोजी सायंकाळी ५-३० वाजता प्रमुख पाहुण्यांचे व उपस्थितांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
नंतर ६-०० वाजता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्व आबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येणार आहे.व त्यानंतर आबासाहेबांची संसदीय कामकाज या विषयावरती माजी मंत्री प्रा.लक्षमणराव ढोबळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख हे असणार आहेत.व प्रमुख पाहुणे म्हणून माळशिरस तालुक्याचे युवा नेते मा.धैर्यशिल मोहिते पाटील उपस्थित राहणार आहेत.
तसेच शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस भाई दादाशेठ बाबर व पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष भाई दिपक गोडसे यांच्यासहित तालुक्यातील विविध संस्थांचे आजी माजी चेअरमन -व्हा.चेअरमन व संचालक तसेच तसेच आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य,आजी माजी सरपंच उपसरपंच व सदस्य आणी गावोगावचे जेष्ठ व युवा कार्यकर्ते व स्व आबासाहेबांच्यावरती नितांत श्रद्धा असणारे नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.