सोलापूर प्रतिनिधी
जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ कोंडी ता.उत्तर सोलापुर येथील सर्व शैक्षणीक विभागातील विदयार्थ्यांच्या पालक शिक्षक सहविचार सभा व गुणवंत विदयार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.या प्रसंगी प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी बोलत होते .यावेळी राजमाता जिजाऊ व सावित्रीमाता यांचे प्रतीमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरवाती झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संजय जाधव , प्रमुख मार्गदर्शक जिजाऊ शिक्षण संकुल खांडवीचे संस्थापक अध्यक्ष संभाजी घाडगे टीव्ही ९ चे रिपोर्टर सागर सुरवसे संस्थेचे अध्यक्ष गणेश निळ विश्वस्त योगेश निळ प्राचार्या सुषमा निळ उपस्थित होते .. यावेळी सर्व विभागातील चारशेहुन अधीक पालक उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी आजच्या बदलत्या युगात पालकांनीही शिक्षणाबद्दल जागृत राहणे काळाची गरज आहे आपण अपडेट राहीलो तरच आपला पाल्यही शैक्षणीक क्षेत्रात प्रगती करू शकेल बदलते युग लक्षात घेता आपण पालक म्हणुन ज्ञानसंपन्न आपण व्हावे असे आव्हान प्रा. स्वामीनाथ कलशेट्टी यांनी केले.
तर संभाजी घाडगे यांनी आजच्या आपल्या मुलांच्या आरोग्याकडे पालकांनी जाणीवपुर्वक लक्ष दयावे. आरोग्य हीच आपली संपत्ती आहे मुलांना सकस आहार दयावा. तसेच संस्कार आपल्या मुलांवर व्हावेत यासाठी आपण आपणही घरामधे ऐकमेकांचा आदर करावा, मोबाईलपासुन मुलांना दुर ठेऊन मैदानी खेळाकडे मुलांना आकर्षीत पालकांनी करावे. आपले मन, मनगट, मेंदु ,मस्तक सशक्त करण्यासाठी शिक्षणाबरोबरच मैदानी खेळही आवश्यक आहेत असे मत व्यक्त केले. तर संस्थापक गणेश निळ यांनी सर्व पालकांना विविध विदयार्थ्याच्या शिष्यवृती बद्दल माहिती देऊन याचा पालकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात प्रा.संजय जाधव यांनी पालक शिक्षक संस्थापक विदयार्थी हीच देशाची पुढची सक्षम पिढी आहे आपण सर्वाजन जागृत राहुन या देशाची चांगली पिढी तयार करुयात असे क्रांतीदिनी आपण आपल्या पाल्याचे गुणगौरव करुन त्याना भारत देश माझा आहे अशी भावना विदयार्थ्यांची झाली पाहिजे असे मत मांडले.या प्रसंगी प्राचार्या. सुषमा निळ यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहीती पालकांना दिली.
या प्रसंगी मधूकर निळ,सिताराम पाटील मुख्याध्यापीका अर्चना औरादे उपस्थीत होते.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विश्वनाथ उपाध्ये प्रा. रवी कौतकौंडे, संकेत मोरे,माऊली भोसले,मिरा माने अश्विनी निळ,प्रियंका निळ,तेजस्विनी कुलकर्णी, प्राजक्ता पाटील,ऋती मकाशे. यांनीं परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. जाधव यांनी केले तर आभार आसमा सय्यद यांनी मानले .