खोपोली प्रतिनिधी - गुरुनाथ तिरपणकर
क्षणभर विश्रांती सामाजिक संस्था वेळोवेळी शैक्षणिक, सांस्कृतिक आणी नाविण्यपुर्ण उपक्रम आयोजित करत असते. स्वातंञ्य दिनाचे औचित्य साधुन क्षणभर विश्रांती या संस्थेने दि.१५ ऑगस्ट २०२३ रोजी वृद्घा श्रमातील ४० आजी आजोबांना मोफत देवदर्शन घडविले.वयोवृद्ध आजी आजोबांना दैंनदिन जीवन जगताना मनाला असंख्य यातना सहन कराव्या लागतात.त्यामुळे म्हातारपणात देवदर्शन घेण्याचा प्रश्नच उदभवत नाही.वृद्धाश्रम हेच त्यांच्यासाठी मंदिर आणी वृद्धाश्रम चालवणारे हेच त्यांच्यासाठी देव.वृद्घाश्रमात असताना त्यांचा बाह्य जगाशी तितकासा संबंध येत नाही.
त्यामुळे क्षणभर विश्रांती दरवर्षी हा उपक्रम आयोजीत करत असते.या उपक्रमात क्षणभर विश्रांती या संस्थेने आजी आजोबांना अष्टविनायकांपैकी महड चा गणपती वरदविनायक तसेच खोपोली येथील गगनगिरी महाराजांचा मठ यांचे दर्शन घडविले. आजी आजोबांच्या चेहर्यावर दिसणारा आनंद, त्यांच्या प्रतिक्रीया आम्हाला असे विविध उपक्रम आयोजित करण्यास प्रोत्साहन देतात असे क्षणभर विश्रांती च्या सदस्यांचे मत आहे. या प्रसंगी वरदविनायक संस्थान,गगनगिरी महाराज मठ संस्थान यांचे विशेष सहकार्य लाभले.
सदर उपक्रमास तरुण मिश्रा,अनिशा राणे,श्रीराम वैदय, सतिश गुजर,प्रसाद पवार, एकनाथ दुदवडकर,भाव्या पवार, दिनेश परब,चंद्रकांत,सरीता परब, मानसी मोने,लकी सरमळकर, पिंकी रोकडे,सुरेखा परब,जोत्स्ना मॅडम तसेच वृद्घाश्रमातील आजी आजोबांचे काळजीवाहक यांचे विशेष सहकार्य लाभले.
क्षणभर विश्रांती सामाजिक संस्था आपल्या अमुल्य सहकार्याबदल खुप खुप आभारी आहे.