सोलापूर प्रतिनिधी
९ ऑगस्ट क्रांती दिनी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी या वर्गात शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव प्रशालेत संपन्न झाला.
या कार्यक्रमच्या प्रारंभी प्रतिमा पूजन शिक्षणाधिकारी . मल्हारी बनसोडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपस्थित असेलेले विस्तार अधिकारी सणके साहेब,केंद्र प्रमुख शिंदे सर, बुलबुले मॅडम, सुतार मॅडम, डोगे सर,धोत्री प्रशालेचे मुख्याध्यापक धाये सर, दर्गनहळळी प्रशालेचे मुख्याध्यापक स्वामी सर यांचा स्वागत सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक सन्माननीय अतनुरे सर आणि पर्यवेक्षक बिराजदार सर यांच्या हस्ते झाला. त्यानंतर विविध प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणगौरव उपस्थित अधिकारी, मुख्याध्यपक आणि शिक्षक यांच्या हस्ते झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री वनकडे वाय एस यांनी केले.कार्यक्रमच्या अखेरीस आभार प्रदर्शन केंद्र प्रमुख शिंदे सर यांनी केले.