पंढरपूर प्रतिनिधी
बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील शेतकऱ्यांची विविध प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अभ्यास समितीत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जवळेकर, बळीराजा चे जिल्हा कार्याध्यक्ष तथा BRS पंढरपूर मंगळवेढा समन्वयक रमेश पवार,जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे, गणेश देशमुख, सुरज वाघमारे इतर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी पाठीमागील महिन्यात मुंबई येथे मीटिंग घेऊन शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजावून घेतले होत्या त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक अभ्यास समिती नेमावी अशी विनंती केली होती त्या पद्धतीने आणि मुख्यमंत्री यांनी शासन निर्णय घेऊन राज्यातील प्रमुख तीन लोकांना या समितीमध्ये घेऊन शेतकरी प्रतिनिधी म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविता या अभ्यास समितीच्या माध्यमातून मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.
पंजाबराव पाटील
संस्थापक अध्यक्ष बळीराजा शेतकरी संघटना महाराष्ट्र

