पुणे प्रतिनिधी
संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७३ वा संजीवन समाधी सोहळा निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे नवनियुक्त कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते संत नामदेव अध्यासनाचे तात्कालिन विभाग प्रमुख डाॅ. सदानंद मोरे यांचे उपस्थितीत डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांनी संपादित केलेला "सार्थ संत नामदेव गाथा खंड १" या ग्रंथाचे संत नामदेव सभागृहाबाहेर लावलेल्या संत नामदेवांच्या तैलचित्राच्या साक्षीने छोटेखानी समारंभात प्रकाशन करण्यात आले. यावेळी कालेकर परिवारातर्फे संत नामदेव महाराज यांच्या तैलचित्रास कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला .
प्रस्तुत ग्रंथात शासकीय नामदेव गाथा प्रमाण मानून ८७१ सार्थ अभंगासहित नवीन स्वरूपात प्रकाशन करण्यात आला. या ग्रंथाचे प्रकाशन करणारे सा. फु. पुणे विद्यापीठ भारतातील पहिले विद्यापीठ असून हा अनमोल ग्रंथ संपादित केल्याबद्दल डॉ. ओमश्रीश श्रीदत्तोपासक यांचा कुलगुरूं डाॅ. सुरेश गोसावी सर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संत जनाबाई च्या अभ्यासक डाॅ. सुमंगला बाकरे, ना.स.प पुणे शहर अध्यक्ष संदिप लचके, सचिव सुभाष मुळे, ज्ञानदीप विद्यार्थी शिक्षण सहाय्य संस्थेचे कार्यवाह सुरेश सोपानराव कालेकर, रामचंद्र सोपानराव कालेकर, शकुंतला हेंद्रे, सौ. शोभा मुळे, सौ. सदानंदी श्रीदत्तोपासक व विद्यापीठातील बहुसंख्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मुळे यांनी केले.

