करकंब प्रतिनिधी
करकंब येथे गेल्या दोन वर्षांपासून करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने ४५० वृक्षारोपण करुन झाडांची जोपासना करण्याच काम अखंड आणि सातत्याने चालू असून याही वर्षी करकंब मोडनिंब रोडवर २००भारतीय जातींच्या झाडांची वृक्षारोपणाची मोहीम सुरू केली असून यामध्ये वड,पिंपळ,लिंब, जांभूळ,करंज,बकुळ आदी झाड लावण्याची काम सुरू आहे, यासाठी पुणेस्थित करकंबकर यांची अनमोल अर्थिक सहकार्य भेटल्यामुळे करकंब गाव हरीत होण्यासाठी मोठी मदत होणार आहे,तसेच करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने अभिनव उपक्रम म्हणजे करकंब गावभागात अंगणात आणि सभोवतालच्या परिसरात झाड लावायचे असेल तर उपलब्ध करून देण्यात येत आहे, पाहिजे त्याला झाड, आणि तेही आवडीच त्यासाठी एक अट आहे एक खड्डा खणून द्यायचा आणि झाड जोपासण्याची जबाबदारी घ्यायची, यासाठी करकंबकरांनी प्रतिसाद सुरुवात केली आहे,तसेच करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने ही झाड आणि ट्रीगार्ड उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
त्याही झाडांची जबाबदारी लेकीच झाड टीमने घेतली असून यावर्षी पासून लएकईबरओबर सुनेचं झाड,आईचं झाड,वडीलांच झाड, आजीच झाड आजोबांचं झाड आणि वाढदिवसाच्या निमित्ताने ही झाड लागणार असून ज्यांना ज्यांना आपली आठवण म्हणून झाड लावायचे असेल त्यांनी 9767776858या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा, करकंब गावहरीत करण्यात बरोबर एकलव्य अभ्यासिका,जागर स्वच्छता अभियान टीमच्या वतीने ही शैक्षणिक आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम सर्वांच्या सहकार्याने चांगल्या प्रकारे होत असून सर्व तरुण वृक्षप्रेमी यांच अनमोल सहकार्य लाभत आहे.
भविष्यकाळात करकंब गाव हरीत करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने करण्यात येत आहे.करकंब गाव हरीत करण्यासाठी करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम यासाठी अधिक परिश्रम घेत आहे.

