मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे फार गरजेचे आहे. निसर्गाचा त्रास होऊ नये म्हणून आरे कॉलनीच्या जंगलामध्ये रोज चालण्यासाठी येणारे वॉकर्स क्लबचे सदस्य यांनी आज रविवार दिनांक २३ जुलै २०२३ रोजी सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. वृक्षारोपणासाठी वॉकर्स क्लबचे सदस्य, त्यांचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांनी बहुसंख्येने भाग घेतला होता. तसेच दिव्यांग करिता काम करणाऱ्या पुनर्वस या संस्थेने दिव्यांग विद्यार्थ्यांसह भाग घेऊन न्युझीलँड हॉस्टेल जवळील आरे कॉलनीच्या जंगलामध्ये विविध प्रकारच्या रोपट्यांचे रोपण केले सुमारे २०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन शशी बोरा , डॉ के सी मेहता, किरण शाह , विद्या नाईक आणि सदस्य यांनी केले होते. जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विधानसभा समन्वयक श्री भाई मिर्लेकर व सायली मिर्लेकर यांनीही सक्रिय भाग घेतला होता.

