भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रास राज्य सरकारने खास बाब म्हणून तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालय म्हणून नुकतीच मंजुरी दिली आहे याकरिता सर्वांचा सहभाग असल्यामुळेच हे शक्य झाले आहे असे मत शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
येथील ग्रामपंचायत च्या वतीने रुग्णालयाच्या मंजुरी करता सहकार्य केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य तानाजी वाघमोडे,पंचायत समिती सदस्य संभाजी शिंदे,डॉ.अभिजित रेपाळ, औषध निर्माता धनंजय धोत्रे, प्रयोगशाळा तज्ञ प्रकाश माळी ,आरोग्य सहायक अंकुश मस्के आदिचा मान्यवरांचा हस्ते सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भगवान चौगुले, हरिभाऊ शिंदे,सुनिल पाटील,सरपंच राजकुमार पाटील,उपसरपंच सविता लोखंडे,ग्राम.सदस्य रणजित जाधव,अर्जुन लिंगे,पोपट इंगोले,जिगर गायकवाड, प्रभाकर गवळी,प्रमोद माने,विशाल म्हेत्रे,विजय लिंगे,शकील काझी,सचिन भोसले,निहल शेख,प्रवीण शिंदे,बापू बुरांडे,सागर चौगुले,भैरू गवळी,अतुल गवळी,शिवाजी लिंगे, माधुरी देठे, परिचर सिद्धेश्वर कौलगे,विलास माने आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संभाजी शिंदे म्हणाले की येथे ग्रामीण रुग्णालयास मान्यता मिळावी हि मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.त्याकरिता सर्वांचे सहकार्य मिळाले.सर्वांनी मिळून प्रयत्न केले.त्यामुळे सरकारने खास बाब म्हणून तीस खाटाचे ग्रामीण रुग्णालयास मान्यता दिली आहे.
यावेळी तानाजी वाघमोडे म्हणाले येथे ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता मिळण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,आ.शहाजीबापू पाटील,प्रशांतराव परिचारक,कल्याणराव काळे,शोभाताई वाघमोडे,संभाजी शिंदे,शिवाजी बाबर,सरपंच,उपसरपंच,नेते,पदाधिकारी,शासकीय अधिकारी,वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे.त्यामुळे या ग्रामीण रुग्णालयास मंजुरी देण्यात आली आहे.
यावेळी फटाके वाजवून उपस्थित ग्रामस्थांना पेढे वाटून शासनासह सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले तर आभार धनंजय धोत्रे यांनी मानले.यावेळी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


