खर्डी प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे त्रिवार्षिक अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये सोलापूर जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर संपर्कप्रमुख म्हणून बंडू लेंडवे यांची नियुक्ती करण्यात आली.
याबद्दल खर्डी येथे शिक्षक मित्र व राजलक्ष्मी परिवार यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, फेटा बांधून सन्मान करण्यात आला.
यावेळी उद्योजक बंडू आबा पाटील, तालुकाध्यक्ष दत्तात्रय येडगे, पतसंस्थेचे संचालक प्रकाश जाधव, संचालक भारत पाटील, नंदकुमार गोसावी, पिंटू खुळे, बाळासाहेब जतकर, शशिकांत गोरे, महादेव भोसले आदी उपस्थित होते.