पंढरपूर प्रतिनिधी
अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या वतीने पंढरपूर येथे सफाई कामगारांच्या विविध मागण्या संदर्भात 44 दिवसाचे सत्याग्रह आंदोलन व दोन दिवसाचे काम बंद आंदोलन या दोन्ही आंदोलनाचे मध्यस्थी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताडे यांनी यावेळी मेहतर समाजाच्या घराचा प्रश्न बाबत व इतर मागण्या संदर्भात विधानसभेमध्ये आवाज उठवण्यात बाबत अभिवचन दिले होते.
त्यानुसार दिनांक 24 /7/ 2023 रोजी रात्री 10 वाजून 38 मिनिटांनी अध्यक्ष महोदयांना बेल वरती कंट्रोल ठेवा मी सकाळपासून माझ्या मतदार संघातील या अतिशय जिव्हाळ्याच्या विषयाकरिता सभागृहामध्ये उपस्थित आहे. असे ठणकावून सांगून मेहतर समाजाच्या निवासस्थानाबाबत व इतर विषयांबाबत हे अतिशय पोटतिटकिने आमदार समाधानदादा आवताडे यांनी विधानसभा च्या सभागृहामध्ये आवाज उठवला आहे.