सोलापूर प्रतिनिधी
श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल समूहाच्या वतीने नवनियुक्त सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाक्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांचा सत्कार आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी क्रीडा अधिकारी सत्यन जाधव लोकमंगल कॉलेजचे क्रीडासंचालक गोकुळ यादव इत्यादी उपस्थित होते.
यावेळी बापूंनी जिल्ह्यातील खेळाडूंसाठी जे काही करता येईल त्यासाठी सदैव मी तुमच्या पाठीशी आहे असे सांगितले व क्रीडा अधिकाऱ्याचे स्वागत ही केले.

