पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
महाराष्ट्र राज्य ऊस नियंत्रण मंडळ यावर पंढरपुरातील अभ्यासू व्यक्तिमत्व माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे प्रशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याने कार्यकर्ते शेतकरी सभासद व पांडुरंग परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
गेली अनेक वर्षापासून सहकार क्षेत्रामध्ये व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून व ितोपियन साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नवीन ऊस देणे सुधारित लागवड यासाठी वेगवेगळे प्रयोग राबवून शेतकरी सभासदांचा असा फायदा होईल.
याकडे त्यांचे अधिक लक्ष असते सहकार क्षेत्रातील तसेच गेली अनेक वर्ष पांडुरंग सहकारी च्या माध्यमातून केलेल्या कार्याचा अनुभव असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक यांची शासनाने अशासकीय सदस्य निवड केल्याने शेतकरी व पांडुरंग परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या निवडीमुळे अनेकांनी पुढील कार्यास भेटून शुभेच्छा दिल्या आहेत

