पंढरपुरात नवीन पुलावर घडला अपघात
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपुरा तील दगडी पुला शेजारील नवीन पुलावर थरकाप उडवणारा अपघात आज संध्याकाळी घडला आहे.
नवीन इमारतीसाठी पत्रे वाहतूक करणाऱ्या टमटम मधून पत्रे वाहतूक करण्यात येत होती.पत्र्याना बांधलेली दोरी निसटल्याने पत्रा उडून थेट पाठीमागून येणाऱ्या दुचाकी वरील एकाचा गळा चिरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे.
अमीन दगडू शेख वय ४० वर्षे (रा. बाळे ता. जि. सोलापूर) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. सदर अपघात घडल्यानंतर पंढरपूर जिल्हा उपरुग्णालयात सदर व्यक्तीवर उपचार सुरू असताना सदर व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.अशी चर्चा ग्रामस्थ करीत होते.

