मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
मुंबईतील आझाद मैदानात दि. १८ जुलै २०२३ रोजीच्या सकाळपासून बारसू व कोकण परिसरातील ३००० पेक्षा जास्त नागरिक आपल्या हक्काच्या जमिनीसाठी उभे राहण्यासाठी एकत्रित आले. "रिफायनरी हटवा कोकण वाचवा", "एकच जिद्द रिफायनरी रद्द ", "कोकणी माणसाचा एकच नारा, रिफायनरीला नाही थारा", "कोकणाला रासायनिक गटार होऊ नाही देणार", "भीत नाही कोणाच्या बापाला आलो रिफायनरी गाडाया" अशी विविध घोषवाक्ये रिफायनरी प्रकल्प विरोधात जमलेल्या आंदोलकांनी आझाद मैदानात दिली.
आपला या प्रकल्पाला असणारा विरोध आंदोलकांनी विविध घोषणाबाजी देत दाखवून दिला व या प्रकल्पाबाबत असणारा तीव्र संताप आंदोलकांतून व्यक्त करण्यात येत होता. संपूर्ण भारतातील अनेक राज्ये विध्वनसक पूर आणि भुस्सखलाने प्रभावित आहेत. उन्हाळ्यात नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा त्रास सहन करावा लागत होता.
यावर्षी शेकडो नागरिकांना नैसर्गिक आपत्तीत जीव गमवावा लागला आहे. तरीही हा निर्णय घेणाऱ्या पदावर बसलेल्या राजकारण्यांनी विकासाच्या या अविचारी कथेवर नागरिकांनी विश्वास ठेवावा असे वाटते, जे लोकांना चांगल्या दर्जाचे जीवन जगण्यास मदत करण्यापेक्षा अधिक नुकसानच करतात.

