जोगेश्वरी प्रतिनिधी - गणेश हिरवे
पूर्वेकडील मजास डेपो ते जोगेश्वरी रेल्वे स्थानक या दरम्यान धावणारी बस ही छोटी २१ आसनी असल्याने या बसला नेहमीच गर्दी असते सदर मार्गावर साधी ३६ आसनी बससेवा सुरू करावी अशी मागणी मजास बस आगार व्यवस्थापक श्री किशोर शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
तसेच जोगेश्वरी पूर्व येथील रेल्वस्थानका जवळील बस थांब्यावर शेड नसल्याने प्रवाशांना भर उन्हा पावसात बसची तासंतास वाट पहात उभे रहावे लागते. बस थांब्यावर शेड बांधण्या संदर्भात तसेच १५ डिसेंबर २०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते बस क्रमांक ४४२ ही बस छोटी २१ आसनी असल्याने सकाळ संध्याकाळ या बसला भरपूर गर्दी असते सदर मार्गावर साधी ३६ आसने असलेली बस सेवा सुरु केल्यास प्रवाशांना विना गर्दी प्रवास करता येईल असे निवेदनात म्हटले आहे या संदर्भात मजास बस आगार व्यवस्थापक श्री. किशोर शिंदे यांना पत्रकार श्री शरद बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते श्री मनमोहन मुळे आणि विजय कांबळे. यांनी निवेदन देऊन लवकरात लवकर बसथांब्यावर शेड बांधावी तसेच ३६ आसनी बससेवा सुरू करुन प्रवाशांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे

