सोलापूर प्रतिनिधी
दक्षिण सोलापूर तालुक्यातील श्री. बृहन्मठ होटगी शैक्षणिक संस्था संचलित श्रीक्षेत्र धोत्री येथील श्री. भगवती गौरीमाता प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावी नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभास अतिशय आनंदाने काशी महापीठाचे नूतन जगद्गुरु श्री.श्री.श्री.1008 ज्ञानसिंहासनाधीश्वर परमपूज्य डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींनी सर्वांना शुभाशीर्वाद दिले.श्री.बृहन्मठ होटगी मठाचे उत्तराधिकारी परमपूज्य चन्नयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी, अभिनंदनरुपी आशीर्वाद दिले. सदर कार्यक्रमासाठी शालेय समितीचे जेष्ठ सदस्य गुरुमूर्ती पाटील साहेब,प्राचार्य नंदकुमार धाये सर,पर्यवेक्षिका सुमन बिराजदार, व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात वीर तपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व तपोरत्न योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आले. विद्यार्थिनींच्या गीताने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी शालेय समितीचे सदस्य मा. श्री.गुरुमुर्ती पाटील साहेब,नूतन प्राचार्य मा.श्री नंदकुमार धाये सर व नूतन पर्यवेक्षिका सौ.सुमन बिराजदार यांचा महाविद्यालयाकडून यथोचित सत्कार करण्यात आला. कु.पद्मिनी लांबतुरे हिच्या प्रास्ताविका नंतर अकरावी नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचे मानवरांच्या शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्राचार्य नंदकुमार धाये म्हणाले की, "विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने,उच्च ध्येये समोर ठेवून खडतर परिश्रम केल्यास निश्चितच यश मिळेल. याशिवाय अभ्यासाबरोबरच शारीरिक तंदुरुस्त असणेही अत्यंत आवश्यक आहे.त्या करिता विविध मैदानी खेळ आत्मसात करावीत. यामुळे आपले, वडिलांचे व शाळेचे नाव उज्ज्वल करावे असेही म्हणाले"
. याप्रसंगी ज्येष्ठ प्राध्यापक. स्वामीनाथ कलशेट्टी, प्रा.मल्लिनाथ हुलसुरे,प्रा.दत्तात्रय बिराजदार,प्रा.सचिन होटगे,आदींचे अभिनंदन व कौतुकही केले. प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी नूतन प्रवेशित विद्यार्थ्यांचे कौतुकपर अभिनंदन केले.कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन अंजली बाबासाहेब पांढरे व आभार अश्विनी शेनकुडे हिने केली.

