केळशी प्रतिनिधी
दिनांक 18 जुलै 2023 रोजी मंगळवारी जि.प. केंद्रशाळा केळशी नं 1 शाळेत शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली.
याप्रसंगी केंद्राचे केंद्रप्रमुख बापट सर केंद्र मुख्याध्यापिका माळवदे मॅडम तसेच इतर मान्यवर मंडळी आणि केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जितेंद्र सुर्वे यांनी भूषविले या कार्यक्रमात सेतू अभ्यासक्रम, शाळा प्रवेश, विद्या प्रवेश या विषयावर शिक्षकांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी दिप्ती दत्तात्रय माळवदे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 2 विद्यार्थी गुणवत्ता यादीत 1 विद्यार्थिनी नवोदय विद्यालय गुणवत्ता यादीत आणल्याबद्दल केंद्राचे केंद्रप्रमुख बापट सर यांच्या हस्ते माळवदे मॅडम यांचा शाल,श्रीफळ,आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर कीर्तन अलंकार पदवी प्राप्त केल्याबद्दल बापट सर यांचाही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुहागरकर मॅडम यांनी केले तर उपस्थित सर्व शिक्षक बांधवांचे शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवलेले गुलाबपुष्प देऊन पालशेतकर मॅडम यांनी स्वागत केले.अत्यंत उत्साहात ही शिक्षण परिषद पार पडली शेवटी माळवदे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले.

