पंढरपूर प्रतिनिधी
आपल्या महाराष्ट्राचे क्रियाशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या टीम मुळे अनेक रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा मिळाल्याने हजारो रुग्णांचे प्राण वाचले तसेच हजारोंच्या रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातून केवळ एकाच वर्षात सुमारे ८६ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून त्यापैकी बऱ्याच जणांचे प्राण वाचले आहेत,त्यामुळे अनेक रुग्णांच्या नातेवाईकांनी माननीय मुख्यमंत्री महोदय व मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख श्री मंगेशजी चिवटे सर व त्यांच्या सहकाऱ्यांना धन्यवाद दिले आहेत
8650567567 या क्रमांकावर संपर्क साधून मदतीचा लाभ घ्यावा असे आवाहन पंढरपूर येथील मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख सौ.मनीषा ताई वासकर यांनी केले आहे
फक्त पंढरपूर तालुक्यातील व शहरातील एकूण २० रुग्णांना आत्तापर्यंत १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले असल्याची माहिती ही मनीषा ताई वासकर यांनी दिली.
याशिवाय वर्षभरात पंढरी नगरीत दोन आरोग्य शिबिरे घेण्यात आली असून , यंदाच्या आषाढी यात्रा कालावधीत सुमारे ३ हजार भाविकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधोपचार ही करण्यात आला,शिवाय ८०० गरजूंना चष्म्याचे वाटप करण्यात आले,ऐन आषाढीच्या एकादशी दिवशी लक्ष्मी व्यंकटेश कुरुलकर या वृध्द महिलेस अर्धांग वायुचा जोराचा झटका आला असताना त्यांचा मुलगा गणेश कुरुलकर यांनी मनिषाताई यांना तात्काळ संपर्क केल्यामुळे ताबडतोब रुग्ण वाहिका मागवून त्वरित उपचार केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले,त्यामुळेच त्यांनी मा.मुख्यमंत्री,निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,कक्षप्रमुख राम राऊत,सतीश गावंडे,मंगेश खताळ , व सौ.मनीषा ताई वासकर यांचे आभार मानले,दोन फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या आरोग्य शिबिरात ही सुमारे १३०० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यांनाही मोफत औषधोपचार करण्यात आला
पंढरपुरातील मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या प्रमुख सौ. मनिषाताई यांच्या सामाजिक जाणिवेतून केलेल्या कार्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून खुप कौतुक होत आहे.
त्यांच्या प्रयत्ना मुळे हरीचंद्र मोरे(५००००),परतूर येथील ज्ञानेश्वर गायके(३५०००), सोलापूर येथील इरंना सिद्राम (७५०००),पंढरीतील संजय ताकभाते(१०००००), मल्लेवाडी येथील भाऊसाहेब गोडगे (७५०००),मोहोळ येथील कविता केसकर (५००००), सोलापुरातील श्री मृगाक डींगरे (५०००), आर्या पिंपळनेरकर(५००००),करमाळा येथील सुधाकर शिंदे यांना (१४००००),संपतराव चव्हाण (५००००),धाराशिव येथील सारिका कदम(१००००), तसेच अनेक लहान मोठ्या गरजूंना मनिषाताई यांनी भरपूर सहाय केले आहे.
तसेच कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष प्रमुख रामहारी राऊत,यांच्या आदेशानुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या पुणे शहर व जिल्हा पातळीवर रामभाऊ भिलारे,पुणे जिल्हा कक्ष प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कुर्डवाडी येथील बानु मुस्तफा पठाण यांना कर्क रोगावरील उपचारासाठी रोहन बलाक्षे व सौ. मनिषा ताई वासकर यांच्या प्रयत्नामुळे एक लाख रुपयांचे सहाय मिळू शकले.


