पळशी प्रतिनिधी
पळशी ता.पंढरपूर येथील शिंदे तरटे मळा व बाबुराव मोरे यांच्या वतीने.सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी भारत नाना कोळेकर यांची निवड झाल्याबद्दल, गोरख भाऊ जाधव यांची संचालक पदी निवड झाल्याबद्दल तसेच तानाजीराव वाघमोडे-देशमुख (संचालक पाडुरंग साखर कारखाना) हे विविध कार्यकारी सेवा सोसायटी गट सचिव या पदावरून सेवानिवृत्त झाल्याबद्दल,पळशी गावचे सरपंच रामभाऊ वाघमारे,सोसायटीचे चेअरमन काशिनाथ आप्पा झांबरे, पळशी ग्रामपंचायत उपसरपंच पदी सचिन शिंदे यांची निवड झाल्याबद्दल वरील मान्यवरांचा सत्कार आज मारूती मंदीर शिंदे- तरटे मळा येथे शिदे तरटे व मोरे परिवाराच्या वतीने संपन्न झाला.
यावेळी दत्तात्रय तरटे,आनंदा शिंदे,लक्ष्मण सुरवसे,बाबुराव मोरे,सुभाष माने,विजय राजमाने,हणमंत तरटे,दशरथ शिंदे, रामा तरटे,दिलीप माने,गोरख तरटे,पाडुरंग इंगळे ,हणमंत खरात, बाबा तरटे,सागर तरटे,नागनाथ झांबरे, शंकर तरटे, सिताराम शिंदे,आदी मळ्यातील ग्रामस्थ उपस्थित होते.