सोलापूर प्रतिनिधी
आज सोमवार दिनांक २४ जुलै २०२३ रोजी नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर मनीषा माणिकराव आव्हाळे यांनी आज सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांना शुभेच्छा व अभिनंदन त्यांचे कार्यालय जाऊन करण्यात आले.
तदनंतर मनीषा माणिकराव आव्हाळे यांचा सत्कार पंढरपूर पंचायत समिती सदस्य, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख पंढरपूर विभाग संभाजी शिंदे यांच्या हस्ते “श्रीं” चे उपरणे व दैनंदिनी देवून सत्कार करण्यात आला.
त्यावेळी व इशाधीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत व सामान्य प्रशासन जिल्हा परिषद सोलापूर उपस्थित होते.