भाळवणी प्रतिनिधी
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे जिल्हा परिषद आरोग्य केंद्रास 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता मिळाल्याबद्दल सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांचा सत्कार सहकार शिरोमणीचे संचालक सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी सरपंच राजकुमार पाटील,युवा नेते दिग्विजय पाटील,ग्राम.सदस्य रणजित जाधव,निहाल शेख,सागर चौगुले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.शहाजीबापू पाटील म्हणाले भाळवणी जिल्हा परिषद गटात राज्य सरकारकडून विविध प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.विविध योजना राबविल्या जाणार आहेत.याकरिता सर्वांचा सहभाग असला पाहिजे.असे ही आ.पाटील म्हणाले.