सोलापूर प्रतिनिधी
केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्याल यातील सिव्हिल विभागा तील ४ विद्यार्थ्यांची जिओ स्पटियाल या नामांकित कंपनीत निवड झाली असून त्यांना वार्षिक पॅकेज २.१६ लाख रुपये असून हे विद्यार्थ्यांची अंतीम वर्षात शिकत असताना कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली.
सिंहगड महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण देण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात अग्रस्थानी आहे. विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणप्रणाली, उच्चशिक्षित व शिस्तप्रिय अनुभवी प्राध्यापक वर्ग, जगातील नामवंत कंपनीमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेल्या नोकऱ्या, सिंहगडचे विद्यापीठातील उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास व्हावा यासाठी महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.अल्पावधितच विद्यार्थी व पालक यांच्या विश्वासास पात्र ठरलेले सिंहगड हे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय असून राष्ट्रीय स्तरावरील मानांकन प्राप्त असलेले सोलापूर जिल्ह्यातील एकमेव महाविद्यालय आहे.तसेच या सर्व गोष्टीमुळे सोलापूर सिंहगड इंजिनीअरिंग कॉलेजला नॅशनल अक्रेडिटेशन अँड अससमेंट कौन्सिल म्हणजे नॅक ' ए ' ग्रेड मिळालेले नामवंत महाविद्यालय आहे.
या यशाबद्दल सिंहगड संस्थेचे सहसचिव संजय नवले, प्राचार्य डॉ. शंकर नवले, उपप्राचार्य डॉ.रवींद्र व्यवहारे व शेखर जगदे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभागप्रमुख डॉ.प्रदीप तपकीरे ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे , सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्राचार्या निकत शेख व तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मच्याऱ्यांनी अभिनंदन केले.

