तेलंगण प्रतिनिधी
तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत
गेल्याच महिण्यात हे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आषाढी निम्मित श्री विठ्ठल व रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या संपूर्ण मंत्री मंडळा सह जवळपास ५०० ते ६०० गाड्यांचा ताफा घेवून श्री पंढरपूर मध्ये आले होते
त्या वेळी पंढरपूर मधील लोकप्रिय आ.भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांचा भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश हि झाला होता.
ह्या प्रवेशानंतर संपूर्ण महाराष्ट्र भर ह्याची चर्चा झाली. साध्या भारत राष्ट्र समितीचे काम जोरदार सुरु आहे. BRS हा पक्ष महाराष्ट्र मध्ये नवीन असला तरीही त्या मध्ये काम करण्यासाठी मोठ्मोठे नेते, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उस्त्सुक आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत ते ह्यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित येत आहेत, १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्याचेच औचित्य साधून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्यांचे जन्मगावी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी येणार आहेत. त्याच्या दौर्याची महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या ह्या दौर्याची जोरदार तयारी हि सध्या स्थानिक नेते मंडळी करत आहेत.

