अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील श्री गुरु बम्मलिंगेश्वर बृहन्मठात मठाचे मठाधिपती श्री ष ब्र. श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात उत्तराधिकारी श्री बम्मलिंगेश्वर देवरु यांच्या नेतृत्वाखाली गुरुपौर्णिमा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार दि.३ जुलै रोजी सकाळी ६ वा. 'श्री'स रुद्राभिषेक, सहस्त्र बिल्वार्चन, महामंगल आरती,८ वा.बम्मलिंगेश्वर देवरु यांचे सामूहिक ईस्टलिंग महापूजा व महाप्रसाद, ११ वा. धर्मसभा, समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व गुणवंत समाजसेवकांचा सत्कार समारंभ, महाप्रसाद होणार आहे तरी सदभक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बम्मलिंगेश्वर मठाच्या वतीने करण्यात आले आहे.