मोहोळ प्रतिनिधी
शिवसेना नेते दीपक गायकवाड यांच्या अथक प्रयत्नानंतर मोहोळ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत चालू झाला आहे. त्यामुळे मोहोळ शहरवासीयांना पाणीटंचाई बाबत मोठा दिलासा मिळाला आहे.
आष्टे -कोळेगाव बंधारा गेल्या कित्येक दिवसापासून कोरडा पडल्याने मोहोळ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावर उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाच्या सोबत शिवसेना नेते दीपक गायकवाड यांनी गेले महिनाभर दिवस रात्र वेगवेगळ्या मार्गातून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मोटार बसवणे, बंधाऱ्यांमध्ये चर घेणे, विहीर घेणे, इत्यादी मार्ग अवलंबून खूप सारे प्रयत्न केले परंतु सर्व प्रयत्न असफल झाले.
दीपक गायकवाड यांनी हतबल न होता विरोधकाच्या टीकेला न जुमानता शासनाकडे टँकरचा प्रस्ताव ही पाठवला. एवढ्यावर न थांबता शिवसेना नेते दीपक गायकवाड यांनी मोहोळ शहराच्या पाणीपुरवठा सुरळीत हवा यासाठी शहरात लगत पाणी असलेल्या विहीरीचे मालक श्री. रमेश माळी यांना भेटून मोहोळ शहराला पाणी देण्याची विनंती केली. त्यावर श्री रमेश माळी यांनी तात्काळ होकार दिला. माळी आणि होकार दिल्यानंतर ताबडतोब कार्यवाही करीत विहिरीचे पाणी नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाने शहरातल्या दोन टाक्यांमध्ये सोडून तात्काळ शहराच्या कार्यान्वित असलेल्या सर्व प्रभागातल्या नागरिकांना नळाद्वारे पाणी दिले.