सोलापूर प्रतिनिधी
गुरुवार दि.15/06/2023 रोजी चालू शैक्षणिक सन 2023-24 या वर्षाची सुरुवात उत्साही व आनंदी वातावरणात झाली सुरुवातीला शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक, वह्या, पेन इत्यादी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेच्या सचिवा धानम्मा मध्दली या होत्या. कार्यक्रमासाठी अजय मद्धली, हुसेन सय्यद व रोहिणी दहीहंडे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री तडकासे यांनी प्रस्ताविक केले, सूत्रसंचालन यळमेली तर आभार प्रदर्शन पवार यांनी केले.
हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.