पंढरपूर प्रतिनिधी
दिल्ली येथे संपन्न झालेल्या 66 व्या राष्ट्रीय शालेय ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय स्वायत्त पंढरपूर येथील बारावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी सार्थक बारले याने 19 वर्षाखालील वयोगटात ओपन साईड रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करून विजयी संपादन केला त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रकांत खिलारे ज्युनिअर विभागाचे उपप्राचार्य प्रा.बाळासाहेब शिंदे पर्यवेक्षक प्राध्यापक युवराज अवताडे यांनी सार्थक बार्लेचे अभिनंदन केले. क्रीडा शिक्षक प्रा.डॉ.सचिन येलभर प्रा. विठ्ठल फुले प्रा. मनोज खपाले यांचे त्याला विशेष मार्गदर्शन लाभले.
सार्थक बार्ली यांनी प्राप्त केलेल्या सुवर्णपदकाने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या यशात आणखीन एक मानाचा तुरा रोला गेला याबद्दल महाविद्यालयाची प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे विशेष कौतुक केले.