गोंदवले प्रतिनिधी
म्हसवड येथील शुभम गॅसचे प्रोपायटर व निवृत्त अभियंता समाजसेवक सुनील पोरे हे नुकतेच सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र गोंदवले येथील ब्रम्हचैतन्य समाधी मंदीराचे दर्शन घेण्यासाठी म्हसवड ते गोंदवले बुद्रुक ते म्हसवड परत असा सायकल ने प्रवास करत आले होते. यावेळी त्यांच्याशी चर्चा करताना निरोगी जिवन व्यतीत करायचे आसेल तर सायकलींग व्यायाम प्रभावी आहे.
यावेळी पोरे म्हणाले दर श्रावणात मी म्हसवड ते पंढरपूर असा प्रवास करतो तसेच शिखर शिंगणापूर व श्रीक्षेत्र गोंदवले बुद्रुक असा सायकलींग प्रवास देखील वेळोवेळी होतो तसेच मी दररोज किमान दहा बारा किलोमीटर सायकलींग करतो त्याचबरोबर स्विमींग देखील करतो.
सद्याच्या धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्तीने किमान एक तास तरी आपल्या शरीराचे समतोल राखण्यासाठी व निरोगी जीवन ठेवण्यासाठी व्यायाम करने नित्याचे व गरचेचे आहे असे प्रकट विचार सुनील पोरे यांनी व्यक्त केले त्यांच्या समवेत म्हसवड येथील पत्रकार मुल्ला देखील सायकलींग करत श्रीक्षेत्र गोंदवले येथे आले होते.