पंढरपूर प्रतिनिधी
रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा संत बाळूमामा दिंडी सोहळा 2023 दिंडी चालक ह भ प श्री गणेश शास्त्री गाडे महाराज फोन नंबर 97 30 39 55 74 वारी मध्ये कोणतीही वैद्यकीय मदत हवी असेल तर वरील क्रमांकावर संपर्क साधावा.
संत बाळूमामा महाआरोग्य शिबिराचा आजचा नवा दिवस महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे श्रीकांत फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD आमचे गुरुवर्य मंगेश चिवटे, मुख्यमंत्री कार्यालयाचे कक्ष प्रमुख राम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली वरील पालखी सोहळ्यातील महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
त्यामध्ये पंढरपूर येथील वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे व नेहमी सामाजिक कार्यक्रमात गोरगरिबांना मायेचा हात देणाऱ्या व शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाच्या पंढरपूर समन्वयक मनीषा ताई वासकर,पत्रकार प्रशांत माळवदे व मेडिकल डिस्ट्रीब्युटर्स यांच्या हस्ते पालखीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वारकऱ्यांना मोफत औषध वाटप करण्यात आले.
त्याचे सर्व आयोजन बारामती तालुक्यातील लिमटेक गावचे सुपुत्र व वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्हा उप समन्वयक सतीश महादेव गावडे व बारामती तालुका समन्वयक मंगेश खताळ यांनी केले होते.