समाजसेवेचा वसा घेवून वंचितासाठी कार्य करीत आहे.आधार हात मदतीचा समूह.
समर्थ आश्रम,प्रतिनिधी
मुंबईच्या उपनगरांत राहणा-या आणि आधार हात मदतीचा या व्हाट्सअप गटाद्वारे एकत्र आलेल्या तरूणांनी आज जीवन आनंद संस्था संचलित विरारफाटा येथील समर्थ आश्रमास भेट देवून आश्रमाच्या गरजा समजून घेवून आवश्यक योगदान दिले.
मुंबईतील जोगेश्वरीत राहणा-या महेश बागवे या युवकाने ११ वर्षांपुर्वी आधार हात मदतीचा हा व्हाट्स अप गट स्थापन केला. या गटाचे सदस्य दरवर्षी एक याप्रमाणे गेली अकरा वर्षे सतत समाजातील निराधार वंचितांसाठी कार्य करणा-या विविध संस्थाना सहाय्य करण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत.
नुकतेच आधार हात मदतीचा या गटाच्या सदस्यांनी विरारफाटा वरठापाडा ता.वसई जि.पालघर येथील जीवन आनंद संस्था संचलित समर्थ आश्रमास सहकुटुंब भेट दिली. व आश्रम च्या तात्कालिक गरजा समजून घेवून आवश्यक किराणा साहित्य, पंखे आणि आर्थिक स्वरूपात सहाय्य केले.
मुंबईतील दररोजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात रविवार सुट्टीच्या दिवशी विशेषतः कुटुंबातील महिला सदस्यांसह गटातील मंडळींनी प्रत्यक्ष आश्रमात येवून आश्रम वासिय बांधवांची आपुलकीने विचारपूस केली. आश्रमातील पुरूष व महिला विभागात आश्रमवासिय बांधवांचा वाढदिवस सामुहिकपणे केक कापून व त्यांना स्वहस्ते भरवून साजरा केला.
मुंबईतील जोगेश्वरी, विलेपार्ले, अंधेरी, दहिसर, मिरारोड, भाईंदर सह विरार या उपनगर भागातून येथून हे सदस्य सहभागी झालेल्या आधार हात मदतीचा समुहातील महेश व मृणाल बागवे, पांडुंरंग केसरकर व त्यांची मुलगी निशा केसरकर, तुषार व पुनम घोटगेकर, जुलेश व तेजल भोजानी, अरूण व सुनिता पांडे यांचेसह .प्रभाकर कातकर(आबा) , मिथुन जाधव, रोहित साहू, गोविंद राठोड, डँनिश डिमेलो, अमन पांडे, अनुज सुर्वे, स्वरूप बागवे, शुभम गौड, महेश गुप्ता ,संतोष डेलेकर, जनार्दन गुरव यांचा यावेळी सहभाग होता. समर्थ आश्रमचे हितचिंतक मित्र किरण अरोलकर यांनी या गट भेटीचे संयोजनात भुमिका पार पाडली.