दीड लाख पोलीस घेणार जेवणाचा आस्वाद.
पंढरपूर प्रतिनिधी
श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी आषाढी वारी यात्रा निमित्त बंदोबस्त करिता सोलापूर ग्रामीण तसेच इतर जिल्ह्यातून 6000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.
या बंदोबस्तातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना तसेच होमगार्ड, एसटी कर्मचारी यांना सोलापूर ग्रामीण पोलीस दलात पोलीस नाईक पदावर कार्यरत असणारे वामन यलमार व त्यांचे सहकारी मित्रांनी सकाळचा नाश्ता व दोन वेळेचे जेवणाची मोफत सोय करून एक चांगला आदर्श समाजा समोर ठेवलेला आहे.
यासाठी त्यांना त्यांची पत्नी प्रीती वामन यलमार यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. यावेळी यलमार म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून सर्व सहकाऱ्यांना जेवण देण्याची इच्छा होती.ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आषाढी वरीचा योग असल्यास मुळे मी जेवण देण्याचा विचार केला.आणि प्रत्यक्ष या वर्षे पांडुरंगाच्या कृपेमुळे ही पण इच्छा पूर्ण झाली. अशीच कार्य आपल्या हातून घडावे हिच श्री समर्थ चरणी प्रार्थना व्यक्त केली.
पोलीस नाईक वामन यलमार यांचे कौतुक करण्यासाठी त्यांचा संपर्क क्रमांक 9665751345 आहे.