पंढरपूर प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
पंढरपूर शहरातील शिवसेना माजी शहर प्रमुख स्व. संदीप केंदळे यांचे गेल्या तीन महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना धीर देताना सर्वोतोपरी मदत करण्याचा शब्द राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिला होता. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटे,हभप गहिनीनाथ महाराज औसेकर,खनिज मंत्री दादा भुसे आदि मान्यवर उपस्थित होते.
आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेला शब्द पाळत स्वर्गीय केंदळे यांच्या कुटुंबियांकडे वैयक्तिक स्वरूपात डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून सुमारे पाच लक्ष रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.