मुंबई प्रतिनिधी
अध्यक्ष जनार्दन जंगले आणि मुंबई TDF वर खोटे आरोप करणारे भ्रष्ट आमदार कपिल पाटील, दोन राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते महामुंबई शिक्षण संस्था संघटना चे व शामानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांचे माध्यमातून अर्जं केलेल्या मनीषा शिंदे, इंडीयन एज्युकेशन सोसायटी (IES) चे सतीश रामा नायक, पायोनियर एज्युकेशन ट्रस्ट चे प्रकाश नलावडे, शीव शिक्षण संस्था चे राजेंद्र प्रधान या सर्वांनी ठरवून संगनमताने व षडयंत्र रचून शिक्षण व शिक्षकांची बाजू घेऊन भ्रष्टाचारावर सातत्याने प्रहार करणाऱ्या मुंबई TDF चे अस्तित्व मिटवून टाकण्यासाठी धर्मदाय आयुक्त यांचेकडे खोटे अर्ज केले.ऐन लॉकडाऊन पासुन गेली तीन वर्षे छळ करून भंडावून सोडणाऱ्याचे षडयंत्र मा धर्मादाय सह आयुक्त यांनी हाणून पाडले.
एका तांत्रिक प्रकरणात सहा. धर्मदाय आयुक्त यांनी दिलेल्या चुकीचे निर्देशlविरुद्ध मुंबई TDF ने रिव्हिजन ॲप्लिकेशन केले होते, मुंबई TDF चे प्रत्येक कृतीवर नजर ठेवणाऱ्या भ्रष्ट कपिल पाटील, संस्थाचालकांनी राज्यपालासह शासनाचे सर्वच आस्थापनाकडे जनार्दन जंगले वर खूप गंभीर खोटे आरोप,खोट्या तक्रारी केल्या, तशाच धर्मादाय आयुक्तांकडे सुद्धा केल्या, सर्व खोट्या तक्रारी दप्तरी दाखल झाल्या, वैफल्यग्रस्त या सर्वांनी मुंबई TDF चे रिव्हीजन ॲपिकेशन मध्ये हस्तक्षेप अर्ज नियोजनबद्धरीतीने आठ आठ महिन्यांच्या मुदतीचे अर्ज वकिलामार्फत दाखल केले, भ्रष्ट कपिल वा भ्रष्ट संस्थाचालक एकदाही प्रत्यक्ष सुनावणीला हजर झाले नाही, केस वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवून आम्हाला फक्त पैशांच्या जोरावर दिशाभूल करून फेऱ्या मारायला लावायचा त्यांचा डाव लक्षात आल्यावर जनार्दन जंगले यांनी स्वतः बाजू मांडायचे ठरविल्यावर समोरचे तज्ञ वकिलांचे डावपेच फसले,आम्ही स्वतः आमचे वकिलाला बाजूला सारून धर्मदाय आयुक्त यांना वस्तुस्थिती सांगितली, अन्यथा आणखी आठ दहा भ्रष्ट संस्थाचालक जमवणे भ्रष्ट कपिलला कठीण नव्हते, अजून काही वर्षे अडकवून ठेवण्याचा डाव आम्ही हाणून पाडला. भ्रष्ट कपिल सह सर्वाचे अर्ज मा धर्मदाय सह आयुक्त यांनी फेटाळून लावले.
प्रकरणी अड हिरालाल गुप्ता यांचे मार्गदर्शन तर होतेच पण IES चे भ्रष्ट कारभाराविरुद्ध लढणlऱ्या व छळाला कंटाळून VRS घेतलेल्या शिक्षिका TDF च्या कार्यकर्त्या अड अपूर्वा दाभोळकर यांचे मार्गदर्शन (सर्व तारखांना हजर राहिलेल्या ) व अनमोल साथ, पदाधिकारी सुनिल वडतकर, प्रवक्ते सुरेंद्र मिश्रा, शिवाजी कुलाळ यांच्या व सर्व कार्यकर्ते,सभासदांच्या सहकार्याने या भ्रष्टांना चारी मुंड्या चीत केले आहे, आता पुढची कायदेशिर लढाई जोमाने सुरू होईल.
जनार्दन जंगले अध्यक्ष शिक्षक लोकशाही आघाडी
TDF मुंबई,9892057818