पंढरपूर प्रतिनिधी
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एमबीए आणि एमसीए या पदव्यूत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेस सुरवात झाली असून एमबीए साठी ही प्रक्रिया दि. ०७ जुलै २०२३ पर्यंत तर एमसीए प्रवेशासाठी ही प्रक्रिया दि. ०५ जुलै पर्यंत चालणार आहे. कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण झालेल्या व एमबीए ची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना एमबीए प्रवेशासाठी सदर ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. तसेच एमसीए ला प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या व एमसीए ची सीईटी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. सदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची मोफत सुविधा स्वेरीतील अनुक्रमे एमबीए व एमसीए विभागात उपलब्ध असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.
कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेले व ज्यांनी एमबीएची सीईटी परीक्षा दिली आहे, असे विद्यार्थी दि. ७ जुलै २०२३ च्या सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ही रजिस्ट्रेशन प्रकिया करू शकणार आहेत तसेच एमसीए प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थी दि. ०५ जुलै २०२३ च्या सायंकाळी ५:०० पर्यंत सदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे, मूळ कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे व कागदपत्रे पडताळणी करून खात्री करणे आदी बाबी करता येणार आहेत. रजिस्ट्रेशनसाठी येताना विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गानुसार असलेली सर्व मूळ कागदपत्रे घेऊन यावीत तसेच सीईटी परीक्षेसाठी रजिस्टर केलेला मोबाइल/नंबर सोबत असावा. ‘सदरची नोंदणी यशस्वीपणे आणि बिनचूकपणे केलेले विद्यार्थीच शासनाच्या कॅप राऊंडसाठी पात्र राहतील. सदर कॅप राऊंड मधून प्रवेशित विद्यार्थीच शासनाच्या वेगवेगळ्या सवलती घेण्यास पात्र राहतील.
त्यामुळे ही प्रवेश नोंदणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असून सर्व विद्यार्थी व पालकांनी स्वेरीत येऊन ही प्रक्रिया येथील तज्ञ शिक्षकांमार्फत पूर्ण करून घ्यावी.’ असे आवाहन प्रवेश प्रक्रियेचे अधिष्ठाता प्रा.करण पाटील यांनी केले आहे. एमबीए व एमसीए च्या प्रवेशासंदर्भात अधिक माहितीसाठी अधिष्ठाता प्रा.करण पाटील (९५९५९२११५४) व एमसीए चे विभागप्रमुख प्रा. मनसब शेख (९०२८९०७३६७) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.