सुस्ते प्रतिनिधी
श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपूर संचलित,श्री दत्त विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, सुस्ते प्रशालेमध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.योगासने आणि व्यायाम यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, त्यांची ओळख आणि माहिती सर्वश्रुत व्हावी यासाठी
दरवर्षी २१ जून हा दिवस जागतिक पातळीवर योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो.मुलांनी शारिरीक व बौद्धिक विकास साधण्यासाठी योगसाधना आत्मसात करण्याबरोबरच योगाभ्यास आणि व्यायाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीत मोलाची भूमिका बजावत असल्याचे प्राचार्य प्रा.सुधाकर पिसे यांनी सांगितले.सुरेश कट्टे व राजेंद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांसमोर योग प्रात्यक्षिके सादर केली.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक रणजीत शिनगारे,विलास दराडे,जैनूद्दीन शेख,धनंजय भाजीभाकरे,देवदत्त वाघ,नितीन वायदंडे,महेश देशमुख,श्रीकांत चंदनशिवे,प्रथमेश गावडे,नवनाथ लोणकर, गणेश पाटील,गणेश खिलारे,श्रीराम खूपसे,बबन कोकतरे, सविता इंगळे,प्रतिभा जावीर,विष्णूपंत घोगले, जेष्ठ लिपिक राजकुमार ढगे,किरण बोधले,धनाजी देठे,संदीप चौधरी,समाधान शेजाळ,राजाराम घोडके,विजय पंडीत, रोहीत हेंबाडे,सरस्वती शिंदे,अंजली कापसे, बबन पवार,बाळासाहेब बनसोडे व सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.