पंढरपूर प्रतिनिधी
आज भारतीय जनता पार्टीचे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण हे पंढरपूर येथे परमात्मा पांडुरंग व रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी आले असता त्यांनी आवताडे फार्म हाऊस येथे सदिच्छा भेट दिली.
यावेळी आपले लोकप्रिय आमदार समाधानदादा आवताडे यांनी मतदार संघाचे दैवत असलेले दक्षिण काशी असे ख्याती असलेल्या परमात्मा श्री.विठ्ठल व श्री.संत दामाजी ची संयुक्त मूर्ती भेट देऊन यथोचित सन्मान केला.
सदर प्रसंगी श्री.संत दामाजी चे मा.व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,जिल्हा नियोजन समिती सदस्य व मा.सभापती प्रदीप खांडेकर,भाजपा जिल्हा संघटन मंत्री शशिकांत नाना चव्हाण,नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, दिगंबर यादव मामा, रमेश टाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.