सोलापूर प्रतिनिधी
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेत योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक प्रतीक खटवटे यांनी विद्यार्थ्यांना ताडासन, वृक्षासन, वज्रासन ,पद्मासन आदी योगासनासह कपालभाती, भ्रामरी, ध्यान आदी प्राणायामाचे प्रात्यक्षिके करुन घेतले. मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शारिरीक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी दररोज योगासने व प्राणायाम करण्याचे आवाहन केले.याप्रसंगी प्रशालेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदानी आनंदाने प्रात्यक्षिकेत सहभाग घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानंद पुजारी यांनी केले.
*नेताजी प्राथमिक शाळेत योग दिन उत्साहात*
नीलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळा व इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून नेताजी हायस्कूलचे मुख्याध्यापक रविशंकर कुंभार , माजी मुख्याध्यापक विजयकुमार हुल्ले, योगशिक्षक सुगेश म्हमाणे आदी उपस्थित होते.
सुगेश म्हमाणे यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व सांगितले तसेच प्रात्यक्षिक करुन घेतले. प्राथमिक शाळा व इंग्लिश मीडियम स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने योगासने केली. विद्यार्थ्यांनी नियमित योगासने करण्याची प्रतिज्ञा घेतली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत बत्तुल यांनी केले तर जगदेव गवसने यांनी आभार मानले.
*राजराजेश्वरी प्रशालेत योग दिन उत्साहात*
विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक प्रशालेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ४०० विद्यार्थ्यांना योगासनाचे धडे देण्यात आले. आर्ट ऑफ लिव्हिंगचे गाजुल,अस्मिता, राहुल,श्लोक या साधकांनी योगासनांची माहिती सांगितले व प्रात्यक्षिके करुन घेतले.प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वनाथ तंबाके व बालक मंदिर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली कुंभार यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले.