पंढरपूर प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसिल कार्यालय पंढरपूर येथे वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर व तालुका च्या वतीने राष्ट्रीय नेते ,श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने खालील मागण्यांसाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
* जाहिर मागण्या*
१. नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथील अक्षय भालेराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून तेथील जातीय व मनुवाद्यांनी त्यांची निर्घृण हत्या केली तसेच जातीवाचक शिवीगाळ करत भय पसरविण्याचे कृत्य केले आहे. बोंढार येथील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देणेत यावी जेणेकरुन दोन समाजात तेढ निर्माण होणार नाही व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही.
२. तसेच मुंबई येथे सावित्रीमाई फुले वसतीगृह येथे शिक्षणासाठी रहात असलेल्या मुलींवर अत्याचार करून तिची हत्या केली. सदर हत्येस जबाबबदार असणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करावी.
३. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे मातंग बांधवाची सावकारकीच्या वादातून हत्या करण्यात आलेली आहे. सदर हत्येस जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी.
४. तसेच महाराष्ट्रात दलित व मुस्लिमांवर होत असलेल्या अत्याचार थांबण्यासाठी कडक कायदा करावा. अनेक ठिकाणी दलित मुस्लिम माँबलिंचिंगचे शिकार झाले असून कित्येक मुलींवर बलात्कार करणेत आलेले आहेत तरी संबंधित सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.
५. त्याचप्रमाणे आळंदी येथे इतिहासात पहिल्यांदाच पोलीस प्रशासनाकडून वारकरी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आलेला व्हिडीओ प्रसार माध्यमांमध्ये असून त्याची चौकशी करुन संबंधित दोषी अधिकारी यांचेवर कायदेशीर कारवाई करावी. ६. नैतिक जबाबदारी समजुन देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा. सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदार पंढरपूर यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष श्रीशैल गायकवाड , जिल्हा उपाध्यक्ष बिराप्पा मोटे , रवी सर्वगोड, युवा जिल्हा संघटक लिंगेश्वर सरवदे , शहर अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, युवा तालुका अध्यक्ष सचिन तुपलोंढे, तालुका अध्यक्ष संतोष कांबळे, तालुका महासचिव कैलास ओव्हाळ , शहर महासचिव सुनील दंडाडे , युवा महासचिव दाजी सातपुते, तालुका उपाध्यक्ष तानाजी कांबळे , मोहन वाघमारे ,सोमनाथ गायकवाड, सज्जन म्हस्के , युवा प्रसिद्धी प्रमुख प्रकाश कांबळे, युवा उपाध्यक्ष नितीन गायकवाड , वंचित कट्टर कार्यकर्ते माया खरे, कविता दंडाडे, प्रकाश सोनटक्के जिल्हा सचिव ,राजू आवारे, वैभव वाघमारे इत्यादी सह जिल्हा , तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.