बारामती प्रतिनिधी
बारामती येथे आज राज्याचे विरोधी पक्षनेते तथा मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची विठ्ठल परिवाराचे नेते सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झाल्याबद्दल सर्व संचालकांचे व नेते मंडळींचे अजितदादा पवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी दादांशी अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा झाली.
यावेळी विठ्ठल परिवाराचे ज्येष्ठ नेते युवराज दादा पाटील सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष गणेश दादा पाटील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक समाधान दादा काळे, नूतन संचालक नागेशदादा फाटे, राजाराम पाटील, मोहनबापू नागटिळक, अमोल माने, सुनील पाटील, योगेश ताड उपस्थित होते.