पंढरपूर प्रतिनिधी तेज न्यूज
येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील बी.कॉम भाग दोन मधील विद्यार्थिनी ऋतुजा धुमाळ हिची उत्तर प्रदेश मधील मेरठ येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ १० मीटर पिस्टल शूटिंग या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात तिचा गौरव करण्यात आला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. टी. जाधव यांच्या हस्ते ऋतुजा धुमाळ हिचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. बी. एस. बळवंत, कॉमर्स विभागाच्या डॉ. सारिका केदार, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. अनिल परमार प्रा. विठ्ठल फुले व प्रा. मनोज खपाले उपस्थित होते.
ऋतुजा हिला या सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून तिच्या मेहनतीचे व सातत्याचे हे फळ आहे. या निवडीबद्दल प्राचार्यांसह महाविद्यालयाचे सर्व उपप्राचार्य, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक वर्गाने तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

