मुंबई प्रतिनिधी गणेश हिरवे
समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय समाजोन्नती संस्था आणि अखिल भारतीय श्री नामदेव छीपा समाज महासभा समिती यांच्या वतीने संत नामदेव शिंपी समाज जोडो अभियानात दोन दिवसीय पंढरपूर दौऱ्यात संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील जन्मस्थानी भेट देऊन नामदेव महाराज यांचे १६ वे वंशज आणि १७ वे वंशज यांच्याशी समस्त नामदेव शिंपी समाज जोडो अभियान तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या प्रसंगी नामदेव महाराजांचे १७ वे वंशज श्री निवृत्ती महाराज नामदास यांनी संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली. त्यातूनच समाजातील संत नामदेव महाराजांबद्दल जे काही गैरसमज आहेत ते दुर करण्यास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना नक्कीच सहकार्य होईल यावेळी नामदेव महाराजांचे वंशज श्री माधव दास महाराज, श्री कृष्णदास महाराज, श्री निवृत्ती महाराज, श्री ज्ञानेश्वर महाराज, श्री मुरारी महाराज यांचा संस्थेच्या वतीने भगवी टोपी, शाल आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अखिल भारतीय श्री नामदेव छीपा समाज महासभा समितीचे नवनिर्वाचित राष्ट्रीय युवा प्रकोष्ट खेमराज नामा यांचा नामदेव महाराजांचे वंशज माधवदास महाराज यांच्या हस्ते पुणेरी पगडी, हार, शाल घालून सत्कार करण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन शुभाशिर्वाद देण्यात आले.
त्यानंतर संस्थेच्या "समस्त नामदेव शिंपी समाज जोडो "या अभियाना अंतर्गत पंढरपूर येथील स्थानिक संत नामदेव शिंपी समाजाचे "अध्यक्ष गणेश बाप्पू उंडाळे "यांची भेट घेतली समाजाच्या विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली समस्त नामदेव शिंपी समाज जोडो अभियानाचे अध्यक्ष श्री गणेश बाप्पू उंडाळे यांनी भरभरून कौतुक केले आणि त्यासाठी लागेल तो पाठिंबा संस्थेस दर्शविण्याची तयारी दाखवली तसेच संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय समाजोन्नती संस्थेचे सरचिटणीस ॲड सागर मांढरे सरकार यांचा सत्कार गणेश बाप्पू उंडाळे यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना, ॲड सागर मांढरे नी आपल्या संदेशात " समस्त शिंपी समाज जोडो" या अभियानात जेष्ठ समाज बंधु-भगिनी बरोबरच तरूण युवक युवतींचा सहभाग वाढण्यासाठी प्रबोधन करावयाची अत्यंत आवश्यकता आहे, प्रत्येकाने याची जाणिव आपल्या नव्या पिढीला करून देणे अतिशय आवश्यक असल्याचे कळकळीने आवाहन केले. प्रत्येक शहरातून हा उपक्रम राबवण्यासाठी समाज बांधवांनी प्रयत्न करुया असा विश्वास व्यक्त केला. "अतिथी देवो भव:" या युक्तिप्रमाणे उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे स्वागत करुन स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर अध्यक्ष गणेश बाप्पू उंडाळे यांचे संस्थेच्या वतीने मन:पुर्वक आभार मानले.
याप्रसंगी समस्त शिंपी समाज बहुउद्देशीय समाजोन्नती संस्थेचे अध्यक्ष मंगेश मांढरे, सरचिटणीस ॲड.सागर मांढरे सरकार तसेच अखिल भारतीय श्री नामदेव छीपा समाज महासभा समितीचे राष्ट्रीय युवा प्रकोष्ट खेमराज नामा, राजेंद्र परमार आणि प्रभारी नविन ठाकूर, अमृतजी छीपा (वलसाड) सपत्नीक उपस्थित होते.